श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. इ.स. १९५३ साली या पुस्तकावर आधारित असलेला 'श्यामची आई' याच नावाचा चित्रपटदेखील पडद्यांवर झळकला. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ’श्यामची आई’ या पुस्तकात मांडलेल्या आहेत. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा ९ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी लिहावयास सुरूवात केल्या आणि १३ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी पहाटे त्या संपविल्या.

इतक्या वर्षांत कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या सर्वांगसुंदर पुस्तकाने केलं आहे. अस पुस्तक वाचक श्री माधवराव वाबळे यांनी सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहेत त्याबद्दल त्यांचे मनः पूर्वक आभार !!




.

Post a Comment Blogger

 
Top