श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दलचा चरित्रग्रंथ आहे गुरुचरित्राची मूळ संस्कृत रचना त्यांचे शिष्य सिद्ध यांची असावी असा रा.चिं. ढेरे यांचा कयास आहे.  सध्या उपलब्ध असलेल्या गुरुचरित्राची मराठी भाषेतील काव्यरचना सरस्वती गंगाधर यांनी इ. सन १५३५ मध्ये केली असावी. गुरुचरित्र या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, दत्तावतार चरित्र, श्रीपादश्रीवल्लभ चरित्र, नरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.
अनेक जणांनी पद्यमय गुरुचरित्राचे गद्यात रूपांतर केले आहे. त्यांपैकी एक म्हणजे बाळ वामनभाई पंचभाई. यांनी लिहिलेल्या ’श्री गुरुचरित्र - जसे आहे तसे’ या पुस्तकात गुरुचरित्राच्या ५२ही अध्यायांतील कथासार साध्या सोप्या मराठीत शब्दबद्ध केले आहे.
श्री गुरु चरित्र  या प्रासादिक ग्रंथाचे वाचन श्री प्रकाश केतकर यांनी केले आहे आणि श्री रजनीकांत चंदवडकर यांनी सर्वाना उपलब्ध करून दिले,  त्यांचे मनापासून लाख लाख धन्यवाद !!


.

 

Post a Comment Blogger

 
Top