प.पु. श्री सद्गुरू श्री वासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराजांनी सर्वा पुराणातील सार काढून श्रीदत्त पुराण या ग्रंथाची संस्कृत भाषेमध्ये रचना केली असून त्याची ज्ञान, कर्म व उपासना हि कांडे आहेत. कालमानानुसार समाजातील संस्कृतचे कमी ज्ञान होऊ लागल्याने शके १८२३ मध्ये (सन १९०१) त्यांनी श्री दत्त पुराणातील उपासना कांडावर 'श्री दत्त महात्म्य' हा प्राकृत ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे एकावन्न अध्याय असून पाच हजार चारशे ओव्या आहेत. अशा या प्रासादिक ग्रंथाचे गद्य रुपांतरीत वाचन रजनीकांत चंदवडकर यांनी करून सर्वाना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून लाख लाख धन्यवाद !!


.


Post a Comment Blogger

 
Top