अमर शक्ती नावाच्या  राजाला बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती नावाचे तीन मूर्ख आणि व्यवहारशून्य मुले होती. राजा आपल्या मुलांच्या या मूर्खपणाला कंटाळला होता. त्याने आपल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे दवंडी देऊन एखाद्या असामान्य, हुशार गुरूचा शोध करविला. त्या दवंडीला प्रतिसाद म्हणून विष्णु शर्मा नावाचा एक ब्राह्मण राजाच्या दरबारी आला व त्याने राजकुमारांना सांगितलेल्या या गोष्टी म्हणजेच पंचतंत्र. पंचतंत्र या नीतिकथा आहेत. कथेला मनोरंजक स्वरूप प्राप्त करणे, व्यवहारात चतुर बनवणे, धूर्तांच्या धूर्ततेचा परिचय करून देणे हा पंचतंत्राचा हेतू आहे. श्री मिलिंद गव्हाणकर यांनी संपूर्ण पंचतंत्रचे वाचन करून सर्वांसाठी  संग्रहित केल्याबद्दल त्यांचे लाख लाख आभार!!






Post a Comment Blogger

 
Top